सुशिक्षित बेरोजगार व होतकरू यांनी फायदा घेण्याची संधी

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या योजनांचा 

सुशिक्षित बेरोजगार व होतकरू यांनी फायदा घेण्याची संधी

                 

गडचिरोली, दि.08: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पुढील प्रमाणे योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन भास्कर मेश्राम जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी केली आहे.

योजना- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), मधमाशा पालन उद्योग प्रशिक्षण व साहित्य वाटप (HONEY BEES).

अनुक्रमाने १ व २ या योजनेअंतर्गत प्रक्रिया व उत्पादन उद्योगाकरिता ५००००/- ते ५० लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव तयार करून बँकेला शिफारीस करण्यात येते. यात मागासवर्ग, महिला, अल्पसंख्यांक व दिव्यांग व्यक्तीस मंजूर प्रकल्पाला ३५% ग्रामीण भाग व शहरी भागासाठी २५% अनुदान(सबसिडी) देण्यात येते.

मधमाशा पालन उद्योग करिता १० दिवस निवासी प्रशिक्षण दिल्या जाते. व साहित्या करिता ५०% अनुदान दिल्या जाते. अधिक माहिती करिता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र एम आय डी सी रोड कोर्टाचे बाजूला कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे बी.एल.मेश्राम जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचेशी संपर्क साधावा मो.न. ९४२१८१७९५४. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.