जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
गडचिरोली, दि.05: दरवर्षी जागतिक सायकल दिन म्हणून ३ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान-किमान कार्यक्रम २०२३ नुसार दिनांक ०३ जुन २०२३ हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्याबाबत निर्देशित केले होते. त्याअनुषंगाने यु.बी. शुक्ल, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे सकाळी जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली श्री. बडगेलवार, क्रीडा प्रशिक्षक, गडचिरोली व सायकल स्नेही मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला. सायकल रॅली जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथून इंदिरा गांधी चौक पुन्हा परत जिल्हा न्यायालय, गडचिरोली अशा मार्गक्रमाने आयोजित करण्यात आली होती. सायकल रॅलीमध्ये जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील कर्मचारी, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, सायकल स्नेही मंडळातील पदाधिकारी/सदस्य, विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.
सायकल रॅली यशस्वी करणेकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे पी.व्ही.संतोषवार, अधिक्षक, एन.आर.भलमे, वरीष्ठ लिपीक, सु.का.चुधरी, जे.एम.भोयर, कनिष्ठ लिपीक, एस. डब्ल्यु वासेकर, शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले. असे अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.