ब्रम्हपुरी || लोकविद्यालय गांगलवाडी शाळेचा उत्कृष्ट निकाल
गांगलवाडी: 02/06/23: दहावीचा निकाल शुक्रवारला जाहीर झाला. परीक्षेत दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरीद्वारे संचालित लोकविद्यालय गांगलवाडी ने दरवर्षीच्या यशाची परंपरा कायम राखत यंदाही *९३.९३* टक्के निकाल दिला आहे. यामध्ये ओम तुळशीदास धोटे हा ८५. ६०* टक्के गुणासह *प्रथम* आला. तर सुनील लालाजी तोंडरे *८४.८०* टक्के गुणासह *द्वितीय* , कुमारी जानवी दामोदर प्रधान *८२.८०* टक्के गुणासह *तिसरी* , कुमारी साक्षी राजू तोंडरे ८३.८० *चवथी* आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे दी रूरल एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्ही. एस. तोंडरे साहेब, सचिव आर. एस. राऊत साहेब, व्ही. एस. बगमारे साहेब, ए. आर. नागमोती साहेब, ए. एम. राऊत साहेब, डी. पी. समर्थ साहेब, लोक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.टिचकुले सर , बुराडे सर, कुथे मॅडम, बुरडे सर, दोनाडकर मॅडम, समर्थ मॅडम , इचकापे सर, रामटेके सर, मेश्राम मॅडम,मेश्राम सर , राऊत सर, नरुले मॅडम,नागमोती मॅडम, घुबडे मॅडम, गजबे सर, निकुरे सर इ.लोक विद्यालय गांगलवाडीचे शिक्षकवृंद सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या घरी जाऊन सत्कार केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.