जिल्ह्यात वाळू विक्रीसाठी डेपो सूरू

जिल्ह्यात वाळू विक्रीसाठी डेपो सूरू

 

भंडारा, दि. 31 मे, : जिल्ह्यात पवनी तालुक्यात मौजा शिवनाळा, लाखांदूर तालुक्यात मौजा नांदेड, तुमसर तालुक्यात मौजा पांजरा येथे वाळू विक्रीसाठी डेपो सुरू करण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार 600 रुपये प्रती ब्रास (600/- रु.+ DMF 10 %+ SI Charg 16.52/-) दरात रेती/वाळू उपलब्ध आहे. रेती/वाळू मिळण्याकरिता तालुक्यातील सेतू केंद्राला भेट देऊन महाखनिज प्रणालीवरुन आधारकार्डव्दारे नोंदणी करता येईल. ज्या नागरिकांना वाळू/रेतीची आवश्यकता आहे त्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

पवनी तालुक्यात मौजा गुडेगांव व मौजा इटगाव, मोहाडी तालुक्यात मौजा निलज व मौजा बेटाळा, भंडारा तालुक्यात मौजा बेरोडी, तुमसर तालुक्यात मौजा लोभी व मौजा बिनाखी येथे लवकरच वाळू डेपो सुरू करण्यात येणार आहे.