स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्यावी

स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्यावी

आमदार सुधाकर अडबाले यांची शासनाकडे मागणी.

 

गडचिरोली : शैक्षणिक सत्र २०२२ – २३ ची अंतिम संच मान्यता, विद्यार्थ्याचे वैध आधार जे स्टुडंट पोर्टलवर नोंदवलेले आहे, त्यावर निश्चित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पटावर दाखल विद्यार्थी/ स्टुडंट पोर्टलवर आधार अपलोड असणारे विद्यार्थि व स्टुडन्ट पोर्टलवर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. यामुळे संच मान्यतेत अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे व वर्ग तुकड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी शासनाकडे मागणी केली.

 

विद्यार्थी शाळेत उपस्थित असूनही किंवा दहावी, बारावीचे बोर्ड परिक्षा दिलेले विद्यार्थी असूनही केवळ आधार कार्ड वैध नाही म्हणून डावलणे व त्याव्दारे होणाऱ्या संच मान्यतेत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे कमी करणे असे शासनाचे धेरण आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही घटकांवर अन्याय होऊन अनुदानित शाळा/ तुकडया बंद करण्याचा घाट रचला जात आहे. यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा तिव्र विरोध आहे, असे झाल्यास संघटना तिव्र आंदोलन करेल असा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिला आहे.

 

शैक्षणिक सत्र २०२२-२३ ची अंतिम संच मान्यता, स्टुडन्ट पोर्टलवर, पटानुसार दाखल विद्यार्थी संख्या किंवा आधार अपलोड असणारे विद्यार्थी संख्या लक्षात घेवून निच्छित करण्यात यावी व शाळांना विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यासाठी एक वर्षाची संधी देण्यात यावी, कारण याकरिता पालकांचे सहकार्य असण्याची गरज आहे, याचे भान ठेवावे, व यासाठी जनजागृती करण्यासाठी शासनाने / शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार अडबाले यांनी शासनाकडे केलेली आहे.