स्वाधार योजनेवर 25 मे रोजी कार्यशाळा

स्वाधार योजनेवर 25 मे रोजी कार्यशाळा

 

चंद्रपूर, दि. 23: अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातीच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाने वसतिगृहाची योजना आणली. तथापि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत वसतिगृहाची क्षमता कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांकरीता शासनाने स्वाधार योजना लागू केली. सदर योजनेच्या प्रचार, प्रसार व जनजागृती करीता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे 25 मे रोजी सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे नागपूर येथील प्रादेशिक उपायुक्त यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यशाळेला जात पडताळणीचे उपायुक्त तसेच संशोधन अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच जिल्ह्यातील समान संधी केंद्र स्थापीत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत.

तरी, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.