जलसाठे पुनरूज्जीवनासाठी चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती Ø जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी

जलसाठे पुनरूज्जीवनासाठी चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती

Ø जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी

 

चंद्रपूर,दि. 17 मे : शासनातर्फे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर तसेच जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावातील पाणी साठवण विहिरी, तलाव व धरण आदि जलसाठ्यात साचलेला गाळ काढून जलसाठ्यांचे पुररूज्जीवन करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन व सामाजिक संघटनांतर्फे चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून काल जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गस्थ करण्यात आले.

 

महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जलसंधारण अधिकारी गीरीष कालकर तसेच भारतीय जैन संघटना व आनंद नागरी बँकेचे महेंद्र मंडलेजा, अभिषेक कांस्टीया, गौतम कोठारी, द्वीपेंद्र पारख, अनिकेत लुनावत, दीक्षांत बेले याप्रसंगी उपस्थित होते.