राजेदहेगाव येथे शासकीय निवासी शाळेत इंग्रजी माध्यमासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

राजेदहेगाव येथे शासकीय निवासी शाळेत इंग्रजी माध्यमासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

 

भंडारा : भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता इयत्ता सहावी ते दहावीवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता सहावी च्या 40 जागेसाठी आणि इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावीच्या प्रवर्ग निहाय रिक्त जागेकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशा करिता अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के व दिव्यांग प्रवर्ग 3 टक्के आरक्षण राहील.

 

प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, बैद्यकीय प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी निवासी शाळा राजेदहेगाव येथून अर्ज प्राप्त करून सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख व मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांनी केले आहे.