गडचिरोली जिल्ह्यात निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन
दि.१४ मे २०२३
गडचिरोली:- दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिविंग एन्व्हांसमेंट द्वारा नियोजित डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,बोदली मेंढा ता.जि. गडचिरोली या ठिकाणी भुमिपुजन सोहळा संपन्न झाला ..
या भुमिपुजन सोहळ्याला आदरणीय.श्री.सुनीलजी देशपांडे, आदरणीय.श्री.दीपकजी तामशेट्टीवार, आदरणीय.श्री.पद्मेशजी गुप्ता, आदरणीय.श्री. शैलेशजी जोगळेकर, माजी केंद्रीय मंत्री मा.श्री. हंसराज जी अहिर,खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम, गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, सरपंच वैशालीताई, मंचावर उपस्थित होते.
डॉ.हेडगेवार हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर गडचिरोली या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार अशोक नेते यांनी बोलतांना आपण उभारत असलेल्या या नव्या रुग्णालयामुळे हजारो, लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे.गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम आदिवासी अविकसित जिल्हा असून या ठिकाणी आरोग्याची सोयीसुविधेचा अभाव फार कमी प्रमाणात असल्याने गडचिरोली वरून रेफर करून नागपूर ला जात असतांना अनेक रुग्ण सोयीसुविधेच्या अभावाने दगावले आहे.गडचिरोली आरोग्याच्या क्षेत्रात मोठे काम आज भूमिपूजन करुन झाले.निश्चितच याचा फायदा गडचिरोली जिल्ह्याला होईल.आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा असून जनतेला सेवा पुरवणे हेच माझे काम असल्याचे” खासदार अशोक नेते यांनी आपले मनोगत भुमिपुजन या सोहळा प्रसंगी व्यक्त केले.
या भुमिपुजन कार्यक्रमाचे प्रस्ताविकपर बोलतांना गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधेचा प्रमाण कमी असल्याने गडचिरोलीमध्ये एक सुसज्ज आरोग्यदायी दवाखाना बनावा असे प्रतिपादन जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा यांनी प्रास्ताविकपर बोलतांना केले.
यावेळी प्रामुख्याने भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,सचिन तंगडपल्लीवार,अरून हरडे, डॉ.मिलिंद नरोटे,डॉ. अमित बाटवे, श्री.धीरज पटेल, श्री.हेमंत राठी, विलास गावंडे जिल्हा सचिव,डॉ. सुरेश दाम्बोले,अॅड. प्रीती डंबोळे,गौरव जी भुसारी,सौ. भुसारीश्री पराग जी पांढरीपांडे,श्री रंजीवजी वाही तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.