संत रोहीदास चर्मोद्योग महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास व्यवस्थापकीय संचालक याची भेट

संत रोहीदास चर्मोद्योग महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास व्यवस्थापकीय संचालक याची भेट

 

भंडारा, दि. 12 : संत रोहीदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी डॉ. बाबासाहेत आंबेडकर सामाजिक न्याय भवन स्थित महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट देउन जिल्हयातील एनएसएफडीसी योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. व उपस्थित सर्व चर्मकार संघटनेच्या तालुकाप्रतिनिधीशी व चर्मकार समाजबांधवांशी संवाद साधत चर्मकार समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक समस्या जाणुन घेतल्या.

 

महामंडळामार्फत असलेल्या अनुदान योजना, बीजभांडवल योजना, मुदतीकर्ज योजना, लघुऋण योजना, महिला समध्दी योजना, शैक्षणिक योजना याबाबत मार्गदर्शन करून भंडारा जिल्हयाला दिलेल्या वाढीव उद्दिष्टांचा योग्यप्रकारे लाभ घ्यावा. प्रलंबित प्रकरणात निधी उपलब्ध झाल्याने कागदपत्रांची पुर्तता करून लवकरात लवकर कर्जप्रकरणे मंजुरीसाठी प्रधान कार्यालयास पाठविण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी जिल्हा व्यवस्थापक यांना दिले.

 

याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी समाजबांधवांना शासनाच्या मदतीने चर्मकार समाजासाठी फुड पार्क तयार करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करणार असे सांगितले. एकूण चर्मकार समाजासाठीच्या योजना, कर्जमाफी, वाढीव अनुदान, स्वाधार योजना, शिष्यवृत्ती योजना, प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज, क्लस्टर, फूड पार्क अशा वेगवेगळ्या विषयावर परीसंवादात चर्चा झाली.

 

या परीसंवादामध्ये भंडारा जिल्हयातील दिलीप तांडेकर, रामजी मनगटे, उमेश बर्वे, विक्की भोंडेकर, सुरेश अवसरे, चंद्रकांत सोनवणे, ग्यानीराम सोनेकर, जाधव चौबे, शंकर लोले,, राजु बर्वे, राहुल मालाधरे, नाशिक भोंडेकर, सुमित मनगटे हे समाजबांधव उपस्थित होते. कार्यकमाच्या शेवटी कल्पना भंगाळे, जिल्हा व्यवस्थापक यांनी परीसंवादात उपस्थित झाल्याबध्दल सर्व उपस्थितांचे आभार मानुन कार्यकमाची सांगता केली.