सिंदेवाहीत वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन- तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सिंदेवाही – व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष अनिल महस्के विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे मार्गदर्शना खाली जिल्हाध्यक्ष संजय पडोळे. डिजिटल यांचे सूचनेनुसार संपूर्ण राज्यासह सिंदेवाहीत वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्याबाबत सिंदेवाही तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून आंदोलन स्थळी तहसिलदार एन. एस. रंगारी यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
माध्यमांकडे लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून उपाय योजना केल्या जात नाहीत. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा., पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी., वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा , पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा , कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
या मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सिंदेवाही तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते अमर बुध्दारपवार , सिंदेवाही तालुकाध्यक्ष दयाराम फटींग , तालुका सरचिटणीस- दिलीप मेश्राम , कार्याध्यक्ष – सुनील घाटे , उपाध्यक्ष खलिद पठाण , उपाध्यक्ष – शशिकांत बदकमवार , कोषाध्यक्ष – प्रशांत गेडाम , कार्यवाहक अरुण मादेशवार , संघटक वहाबअली सय्यद , सदस्य कुसन गौरकर , डिजीटल मिडीया अध्यक्ष मिथुन मेश्राम अमन कुरेशी आदीसह प्रिंट मिडीया व डिजीटल मिडीयाचे पत्रकार बांधव , सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.