गडचिरोली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न
गडचिरोली, दि.11: विशेष सहाय्य योजने अंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध अंपग शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्तया, देवदासी महिला, अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्याकरीता गडचिरोली तालुक्यातील शासकीय योंजनांची जत्रा महाराजस्व अभियानात जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज तलाठयांमार्फत भरुन घेण्यात येतात. विशेष सहाय्य योजने अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज दिनांक 28 एफ्रिल 2023 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती समोर ठेऊन समितीचे अध्यक्ष तहसिलदार, तहसिल कार्यालय गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यात आली. सदर सभेला मुख्याधिकारी, नगरपरिषद गडचिरोली व संवर्ग विकास अधिकारी पं.सं. गडचिरोली हे शासकीय सदस्य उपस्थित होते.
सदर सभेत पुढील प्रमाणे अर्ज मंजुर/नामंजुर करण्यात आले. योजनेचे नाव- संजय गांधी निराधार अनुदान योजनेकरीता एकूण प्राप्त प्रकरणे 17 त्यापैंकी 17 मंजूर प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 06 प्राप्त प्रकरणे त्यापैकी 05 मंजूर प्रकरणे तर 01 प्रकरणे नामंजूर, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना प्राप्त प्रकरणे 40 त्यापैकी 34 मंजूर प्रकरणे तर 06 नामंजूर प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकुण प्राप्त प्रकरणे 22 त्यापैकी 18 मंजूर प्रकरणे तर 04 नामंजूर प्रकरणे झालीत.
तसेच वरिल आयोजीत सभेच्या वेळी डी. ए. ठाकरे नायब तहसिलदार,(सं.गां.यो) तहसिल कार्यालय गडचिरोली, एल. एम. अल्लीवार अव्वल कारकुन, कु. एस. व्ही. कोडापे महसूल सहाय्यक व कु. रजनी डोंगरे डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी विशेष सहाय्य योजनेची प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले. विशेष सहाय्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज महाराजस्व अभियानात किंवा तहसिल कार्यालयात तलाठयां मार्फत सादर करणेबाबत महेंद्र गणविर, तहसिलदार, गडचिरोली यांनी जाहीर आवाहन केले आहे. असे नायब तहसिलदार, (संगांयो) गडचिरोली, ङि ए. ठाकरे यांनी कळविले आहे.