शेतकऱ्यांना मका खरेदीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन
Ø जिल्ह्यामध्ये मका खरेदीसाठी खरेदी केंद्र निश्चित
चंद्रपूर, दि. 10: किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनाने पणन हंगाम 2022-23 मध्ये रब्बी मका खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, सेवा सहकारी संस्था मर्यादित पाथरी व कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा या खरेदी केंद्राचा समावेश आहे.
या खरेदी केंद्रावर दि. 4 ते 20 मे 2023 या कालावधीत मका खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी मका नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक तसेच सातबारा उतारा आदी कागदपत्रे सोबत घेऊन प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.