खरीप हंगाम सन २०२२ राज्यस्तरीय पिकस्पर्धा निकाल जाहीर
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या पिक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. राज्यात खरीप हंगाम सन २०२२ मध्ये भात, ज्वारी, बाजरी,मका,नाचणी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजन करण्यात आले होते. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२२ पिकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल मा. आयुक्त कृषी श्री. सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पिकस्पर्धा निकाल समितीद्वारे जाहीर करण्यात आले.
राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी श्री. नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. मराठवाड्यातील महिला शेतकरी श्रीमती जयश्री भीमराव डोणगापुरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेतकरी श्री. बाजीराव सखाराम खामकर यांनी सोयाबीन सर्वसाधारण गटात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. नांदेडच्या श्रीमती वनिता श्रीराम फोले यांनी सोयाबीन आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम तर यवतमाळच्या श्रीमती रेखा रमेश कुमरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. शेतकरी श्री.प्रल्हाद नारायण काळभोर यांनी ज्वारी पिकात तर श्री.संभाजी तातोबा खंडागळे यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सात पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.
बक्षीसाचे स्वरूप : १.राज्यस्तरीय प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम रु. ५००००
२. राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ४००००
३.राज्यस्तरीय तृतीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ३००००
स्पर्धेचा निकाल असा : शेतकऱ्याने एका हेक्टर मध्ये घेतलेले उत्पादन क्विंटल मध्ये देण्यात आले आहे.
खरीप हंगाम सन २०२२ राज्यस्तरीय अंतिम निकाल
राज्यातील गुणांनुक्रम विभाग स्पर्धक शेतक-याचे नाव गाव तालुका जिल्हा शेतक-यांचे उत्पादन क्वि./हे राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनात्मक पटीने उत्पादकता
भात (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता- 20.54क्वि./हे
१ पुणे श्री. नितीन चंद्रकांत गायकवाड चांदखेड मावळ पुणे 131.97 ६.४ पट
२ कोल्हापूर श्री. कृष्णात गोपाळ खाडे सांगरुळ करवीर कोल्हापूर 129.47 ६.३ पट
३ कोल्हापूर श्री. बाबूराव आप्पाजी परीट सुळकूड कागल कोल्हापूर 117.82 ५.७ पट
भात (आदिवासी गट) राज्याची सरासरी उत्पादकता -20.54 क्वि./हे
1 पुणे श्रीमती चांगुनाबाई भिका गवारी कोल्हेवाडी जुन्नर पुणे 110.12 ५.३ पट
2 पुणे श्री.मुरलीधर सखराम कवठे कोपरे जुन्नर पुणे 106.95 5.2 पट
3 पुणे श्री.शांताराम तुकाराम बोकड आळे जुन्नर पुणे 98.05 4.7 पट
खरीप ज्वारी (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 7.69क्वि./हे
१ कोल्हापूर श्री.प्रल्हाद नारायण काळभोर हरपळवाडी कराड सातारा 59.95 7.7पट
२ नाशिक श्री.ज्ञानेश्वर चिंतामण पाटील गहूखेडे रावेर जळगाव 40.00 5.2पट
३ नाशिक श्री.अर्जुन दामू पाटील वडगाव रावेर जळगाव 35.00 4.5पट
खरीप ज्वारी (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 7.69क्वि./हे
१ नाशिक श्री.रोहिदास विजय पाडवी धनपूर तळोदा नंदुरबार 32.98 4.2पट
२ नाशिक श्री.बिलाडया चमा-या पावरा शेमल्या शिरपूर धुळे 24.53 3.1पट
३ नाशिक श्रीमती सुकमाबाई खुमसिंग पावरा पानखेड शिरपूर धुळे 24.20 3.1पट
खरीप बाजरी (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 8.79क्वि./हे
१ कोल्हापूर श्री.विठ्ठल इश्वर सांवत माडग्याळ जत सांगली १०१. ७६ 11.5पट
२ कोल्हापूर श्री.विठ्ठल बापू चोपडे माडग्याळ जत सांगली 98.41 11.1पट
३ कोल्हापूर श्री.नामदेव चनबसू माळी माडग्याळ जत सांगली 96.74 11पट
खरीप बाजरी (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 8.79क्वि./हे
१ नाशिक श्री.लक्ष्मण जगन पावरा हाडाखेड शिरपूर धुळे 17.60 2पट
२ नाशिक श्री.जगदीश हारु पावरा हाडाखेड शिरपूर धुळे 17.40 1.9पट
३ नाशिक श्री.वामन लालसिंग पावरा हाडाखेड शिरपूर धुळे 16.90 1.9पट
मका (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 24.85क्वि./हे
१ कोल्हापूर श्री.संभाजी तातोबा खंडागळे अग्रण धुळगाव कवठेमहाकांळ सांगली 177.59 7.1पट
२ पुणे श्री.सुमंत तुळशीराम पवार वाटंबरे सांगोला सोलापूर 172.50 6.9पट
३ पुणे श्री.भिमराव राजाराम खर्चे लोणविरे सांगोला सोलापूर 165.30 6.6पट
मका (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 24.85क्वि./हे
१ नाशिक श्री.दशरथ राज्य वळवी भादवड नवापूर नंदुरबार 105.00 4.2पट
२ नाशिक श्री.गंगाराम वेस्ता पावरा चाकडु शिरपूर धुळे 90.00 3.6पट
३ नाशिक श्री.रणजित गणा पावरा चाकडु शिरपूर धुळे 89.50 3.6पट
नाचणी (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 11.55क्वि./हे
१ कोल्हापूर श्री.शिवलिंग कल्लाप्पा गावडे हंबीरे चंदगड कोल्हापूर 74.20 6.4पट
२ कोल्हापूर श्री.बाळू लक्ष्मण भडगावकर सातवणे चंदगड कोल्हापूर 66.50 5.7पट
३ कोल्हापूर श्री.विष्णू धोंडिबा गावडे ई-म्हाळूंगे चंदगड कोल्हापूर 60.20 5.2पट
नाचणी (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 11.55क्वि./हे
१ ठाणे श्रीमती शिडीबाई सोमा बरतड रोडवहाळ शहापूर ठाणे 20.80 1.8पट
२ ठाणे श्री जानु ओको कामडी मुसईवाडी शहापूर ठाणे 20.80 1.8पट
३ ठाणे श्री.पद्माकर महादु वाख मुसईवाडी शहापूर ठाणे 17.32 1.5पट
तूर (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 9.44क्वि./हे
1 लातूर श्रीमती जयश्री भीमराव डोणगापुरे रावणगाव उदगीर लातूर 46.64 4.9पट
2 पुणे श्री.विक्रम पंढरीनाथ अकोलकर करंजी पाथर्डी अहमदनगर 41.60 4.4पट
3 पुणे श्रीमती बाई बुवासाहेब शिंदे धोंडपारगाव जामखेड अहमदनगर 38.84 4.1पट
तूर (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 9.44क्वि./हे
1 नाशिक श्री. दिलीप चामट्या भिल बामखेडा त.स. शहादा नंदुरबार 10.60 1.8पट
मूग (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 4.35क्वि./हे
१ पुणे श्री. सुभाष बाजीराव कर्डिले रांजनगाव मशिद पारनेर अहमदनगर 20.22 4.6पट
२ पुणे श्री.गोरख हरीभाऊ जाधव अकोळनेर अहमदनगर अहमदनगर 17.80 4 पट
३ पुणे श्री.धोंडीभाऊ मारुती जरे ससेवाडी अहमदनगर अहमदनगर 16.80 3.8पट
मूग (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 4.35क्वि./हे
१ नाशिक श्रीमती शांताबाई पंडित चौधरी मेहदर कळवण नाशिक १०.०० 2.2पट
२ नाशिक श्री. प्रकाश हेमकांत बंकाळ मेहदर कळवण नाशिक 9.60 2.2पट
उडीद (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 4.65क्वि./हे
१ पुणे श्री.दिपक तुकाराम ढगे निमगाव गांगर्डी कर्जत अहमदनगर 33.00 7पट
२ पुणे श्री. नितीन सुर्यकांत शेटे धोत्री जामखेड अहमदनगर 31.30 6.7पट
३ पुणे श्री.भागचंद्र शाहुराव उगले नायगाव जामखेड अहमदनगर 28.92 6.2पट
उडीद (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 4.65क्वि./हे
१ नाशिक श्री.सखाराम कैस गावित खोकसा नवापूर नंदुरबार 7.00 1.5पट
सोयाबीन (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 11.97क्वि./हे
1 कोल्हापूर श्री. बाजीराव सखाराम खामकर बोरपाडळे पन्हाळा कोल्हापूर 76.00 6.3पट
2 लातूर श्री राजाराम योगाजी शिंदे कासारखेडा नांदेड नांदेड 71.40 5.9पट
3 कोल्हापूर श्री. रमेश विलास जाधव येलूर वाळवा सांगली 68.30 5.7पट
सोयाबीन (आदिवासी गट)राज्याची सरासरी उत्पादकता 11.97क्वि./हे
1 लातूर श्रीमती वनिता श्रीराम फोले सांगवी किनवट नांदेड 40.98 3.4पट
2 नाशिक श्री.नारायण मल्हारी तुगार चौसाळे दिंडोरी नाशिक 38.40 3.2पट
3 अमरावती श्रीमती रेखा रमेश कुमरे चिंचवळ मारेगाव यवतमाळ 37.00 3पट
भुईमुग (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 11.59क्वि./हे
१ कोल्हापूर श्री. कृष्णा भाऊ चौगुले बहिरेवाडी आजरा कोल्हापूर 61.33 5.2पट
२ कोल्हापूर श्री.रामचंद्र विठू कोरे ऐतवडे खु. वाळवा सांगली 60.31 5.2पट
३ कोल्हापूर श्रीमती सावित्रीबाई रामचंद्र पाटील ऐतवडे खु. वाळवा सांगली 55.73 4.8पट
सुर्यफुल (सर्वसाधारण गट)राज्याची सरासरी उत्पादकता 5.09क्वि./हे
१ पुणे श्री.सोपान कृष्णा कारंडे डिकसळ सांगोला सोलापूर 32.18 6.3पट
२ पुणे श्री.विश्वनाथ भिमराव पाटील मुंढेवाडी मंगळवेढा सोलापूर 29.30 5.75पट
३ पुणे श्री.भारत लक्ष्मण मुंगसे बोराळे मंगळवेढा सोलापूर 28.80 5.65पट
पिकस्पर्धा खरीप हंगाम सन २०२२ मधील सर्व राज्यस्तरीय विजेते शेतकऱ्यांचे कृषी विभागामार्फत हार्दिक अभिनंदन..!!!
पिकस्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम रु. ३०० प्रवेश शुल्क भरून पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.