मधमाशी दिनानिमित्य पुरस्कार वितरण करण्यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 04: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ अंतर्गत मध संचालनालय, महाबळेश्वर येथे 20 मे 2023 रोजी मधमाशी दिनाचे औचित्य साधून मधमाशी पालन उद्योगांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लाभार्थ्यास मधमाशी मित्र पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाअंतर्गत मध संचालनालय, महाबळेश्वर येथे सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मधमाशा उद्योगांमध्ये सातेरी, मालीफेरा व आग्या मधमाशांचे संगोपन करून मधाचे उत्पादन घेणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. त्याकरीता सदर व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्जासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा माळा, उद्योग भवन, एस.टी स्टँड समोर येथील कार्यालयास संपर्क साधावा. तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी 07172-252142 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी. एल. मेश्राम तसेच औद्योगिक पर्यवेक्षक आर.आर. हुमणे यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी. एल. मेश्राम यांनी कळविले आहे.