निवृत्तीवेतनधारकांना सुचना
भंडारा दि. 3 : सन 2023-24 मध्ये नविन कर प्रणाली डिफॉल्ट घोषीत करण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकांना जर जुन्या कर प्रणालीनुसार आयकर कपात करायचा असल्यास कोषागार कार्यालयास विकल्प भरून देणे आवश्यक आहे.
तरी सर्व आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांनी आपला आयकर कपात कोणत्या प्रणालीनुसार करावा याबाबतचा विकल्प 10 मे 2023 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करावा. आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांनी विहीत मुदतीत विकल्प सादर न केल्यास त्यांचा आयकर नवीन कर प्रणालीनुसार कपात करण्यात येईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांनी कळविले आहे.