हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन
· जिल्ह्यात सात ठिकाणी आपला दवाखाना
भंडारा, दि. 2 मे, : शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी शहरी भागात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना डॉ. झाकीर हुसैन वार्ड, भंडारा येथे कार्यन्वीत करण्यात आला आहे. नुकतेच महाराष्ट्र दिनी या आपला दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच शहरातील इतर भागात आरोग्यवर्धीनी केंद्र आंबेडकर वार्ड भंडारा, सुभाष वार्ड, भगतसिंग वार्ड टाकळी, तकिया वार्ड, खात रोड, भंडारा, रमाबाई आबेंडकर वार्ड आरोग्यवर्धिणी केंद्र मंजूर करण्यात आलेले आहे.
आपला दवाखाना केंद्रामध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्सरे करिता संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी लसीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण सेवा मोफत पुरविण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये तज्ञ वैद्यकीय पथक उपलब्ध असतील.
जिल्ह्यात खालील सात आपला दवाखाना
श्रीराम नगर, नगरपरिषद तुमसर, बस्तरवारी वार्ड, नगरपरिषद पवनी, प्रभाग न. 1 नगरपंचायत लाखनी, टि.पॉइट परिसर नगर पंचायत, लाखांदूर, डॉ. झाकीर हुसैन वार्ड, नगर परिषद भंडारा, सेंदुरवाफा, नगरपंचायत, साकोली, गांधी वार्ड नगर पंचायत मोहाडी या सात ठिकाणी आपला दवाखाना कार्यरत असून त्याव्दारे सामान्य नागरिकांना वेळेत व सुलभ वैद्यकी सेवा देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कविता बारसागडे यांनी केले तसेच आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पवनकर यांनी केले.