अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी योजना

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी योजना

 

चंद्रपूर, दि. 28: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जीन मनी उपलब्ध करुण देण्याबाबतची योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट अँड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

 

जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन जलनगर वार्ड, चंद्रपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.