जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
भंडारा, दि. 21 : क्रीडा व युवक सेवा संचालनालया, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत जिल्हास्तर क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि. 24 एप्रिल 2023 ते दि. 4 मे 2023 या कालावधीत सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे करण्यात आले आहे.
त्यात प्रामुख्याने व्हॉलीबॉल व सॉफ्टबॉल, खेळ प्रकाराचा समावेश राहणार आहे. संबंधित खेळाचे तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न राहणार आहे. या शिबीराद्वारे खेळाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. तसेच प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेवून दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येईल.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयातील खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.