मुल पोलीसांनी गुरे वाहुन नेणाऱ्या दोन ट्रक मधील ५० गोवंशिय जनावरांची सुटका करून एका आरोपीस केले जेरबंद

मुल पोलीसांनी गुरे वाहुन नेणाऱ्या दोन ट्रक मधील ५० गोवंशिय जनावरांची सुटका करून एका आरोपीस केले जेरबंद

 

दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशान्वये ऑल ऑऊट ऑपरेशन मोहिम दरम्यान गांधी चौक मुल येथे नाकाबंदी करीत असता सावली वरुन मुल कडे दोन ट्रक मध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतुक करीत असल्याबाबत गुप्त माहिती पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी यांना मिळाल्याने त्यांनी गांधी चौक मुल येथे रात्रौ ०३:०० वाजता दरम्यान पंचासह नाकेबंदी करीत असता (१) ट्रक क्रमांक एपी२९- टीबी – ३५१९ या ट्रक ला थांबवून त्याची पाहणी केली असता सदर ट्रकचे मागल्या डायामध्ये मध्ये लहान मोठे २४ नग बैल किंमत ३,२०,०००/- रुपये (२) ट्रक क्रमांक एपी २० – वाय – ९४५५ चे मागचे डाल्यामध्ये लहान मोठे २६ नग बैल किंमत ३,६०,०००/- रुपयाचे अवैधरित्या निर्दयतेने वाहतुक करुन घेवुन जात असतांना मिळुन आले व वाहतुकी करीता वापरण्यात आलेले दोन्ही ट्रक किं. १०,००,०००/- रु. असा एकुण १६,८०,०००/- रुपयाचा मुद्देमाल नेत असता मिळुन आल्याने आरोपी नामे (१) प्रशांत बाळा जुमनाके वय २८ वर्ष रा. गडचांदुर, (२) मोहम्मद अली अजगर अली सैयद, (२) किस्मत अली मो. अली सैयद दोन्ही रा. टेकाडी यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक १५५/२०२३ कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी सुधारीत अधिनियम १९७६ सहकलम ११, (१) (ड) प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी तसेच अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीका अर्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी, सपोनि श्री सतिश बनसोड, सफौ उत्तम कुमरे, पोहवा पुंडलिक परचाके, नापोअ सचिन सायंकार, सुनिल घोडमारे, पोअं गजानन तुरेकर, चालक पोअं स्वप्नील यांनी केली असुन पुढील तपास सपोनि श्री सतिश बनसोड करीत आहेत.