ग्रामपंचायत पोटनिवडणूक असलेल्या क्षेत्रात आचार संहिता लागू

ग्रामपंचायत पोटनिवडणूक असलेल्या क्षेत्रात आचार संहिता लागू

 

भंडारा, दि. 20 : भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकींचा कार्यक्रम निवडणुक आयोगाकडून प्राप्त झाला आहे.

 

भंडारा तालुक्यातील जामगाव-वळद (पु), पलाडी, उमरी, टेकेपार डो, राजेगाव, मानेगाव बा, भिलेवाडा व बोरगाव खु. या ग्रामपंचायती क्षेत्रात निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे, असे आदेश तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी अरविंद हिंगे यांनी निर्गमीत केलेले आहे.