25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिवस
भंडारा, दि. 20 : 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात येणार असून हिवताप, डेंग्यु व इतर किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. प्रतिरोध उपाय योजनांच्या अमलबजावनीमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाव्दारे जनतेपर्यंत माहिती पोहचविणे व हिवताप, डेंग्यू इत्यादी किटकजन्य आजाराचा नायनाट करणे हा प्रमुख उददेश आहे.
सन 2022 मध्ये भंडारा जिल्हयातील 28 गावात हिवताप, डेंग्यू इत्यादी किटकजन्य व जलजन्य आजाराची लागण झाली. त्यामुळे किटकजन्य आजाराचे नियंत्रण करण्याकरीता जिल्ह्यातील जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. माहे जून 2023 पासून (पारेषण काळ) पावसाळा सुरु होत असल्याने किटकजन्य आजाराचे संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी स्थानिक परिस्थतीनुसार गाव पातळी पर्यंत योग्य तें प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना सतर्कतेने राबविणे गरजेचे आहे. त्याची पूर्व तयारी पारेषण काळापूर्वीच करुन किटकजन्य आजार आटोक्यात ठेवणे शक्य होईल.
या मोहिमेच्या अधिक प्रभाविपणे अमलबजावनी साठी कृती कार्यक्रम तयार करून मोहिम प्रभाविपणे राबविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा, तालुका व प्रा. आ. केंद्र स्तरावर करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने महिलामंडळ स्वयंसेवी संस्था यांना आमंत्रित करण्यात येईल. जिल्हा/तालुकास्तरावर / प्रा. आ. केंद्रस्तरावर हिवताप किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक संबंधी उपाययोजना विषयक आरोग्य शिक्षण अंतर्गत पोर्टस, बॅर्नर, डास अळ्या, गप्पी मासे, किटकनाशके इत्यादी प्रदर्शनीमध्ये लावून व त्याची माहिती जनतेला देण्यात येईल. ग्रामीण आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची सभा ग्रामस्तरावर आयोजित करून त्यामध्ये हिवताप व डेंग्यू आजार हटविण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात येईल.
किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता नाल्यागटारे वाहती करणे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, ताप आल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेमधुन रक्त तपासून घेणे, कुलरच्या टाकीतील पाणी आठवडयातून एकदा कोरडे करणे, साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑईल/रॉकेल सोडणे, डासाला पळवून लावणाऱ्या साधनांचा वापर करणे, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करणे या उपाययोजना करण्यात याव्या.
तरी सदर प्रतिबंधात्मक उपाययोजनेची प्रभावी अंमलबजावनी करून हिवतापास प्रतिबंध करण्याकरिता सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प डॉ. मिलींद सोमकुवर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अदिती त्याडी यांनी केले आहे.