भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त
सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन !
भंडारा, दि. 14 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे दि. 14 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 8.00 वा. सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन शालेय विद्यार्थ्यांचे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन समता रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
समता रॅली ही सामाजिक न्याय भवन येथून राजीव गांधी चौक-मुस्लीम लायब्ररी चौक मार्गे त्रिमुर्ती चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळी 10.00 वा. पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भंडारा जिल्ह्याचे सन्माननीय खासदार मा.श्री.सुनिल मेंढे, मा.श्री.नानाभाऊ पटोले, आमदार, माजी आमदार श्री.डॉ.परिणय फुके, जिल्हाधिकारी मा.श्री.योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.लोहित मत्तानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. श्री.समिर कुर्तकोटी, स्मारक समितीचे उपाध्यक्ष श्री.बागडे, सचिव श्री. राऊत कोषाध्यक्ष श्री. महेंद्र वाहणे, श्री.असीत बागडे, काँग्रेस कमेटीचे महासचिव श्री.प्रेमसागर गणवीर व इतर सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
समता रॅलीमध्ये दोन डिजीटल समता रथंचा सहभाग करण्यात आला. तसेच भंडारा शहरातील बंशीलाल लाहोटी नुतन महाराष्ट्र विद्यालय, नुतन कन्या कनिष्ठ महा., भगीरथा भास्कर हायस्कुल, महिला समाज प्राथ. शाळा, संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय, अरोमिरा नर्सींग कॉलेज, आठवले समाजकार्य महा., मा.व.मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येनी सहभाग नोंदविला. सहाय्यक आयुक्त श्री.बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी, आठवले समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी, रॅलीमध्ये सहभागी विद्यालयाचे शिक्षकवृंद, क्रिस्टल-बिव्हीजी कंपनीचे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच सर्व कार्यक्रमाचे सुत्र संचालन समाज कल्याण कार्यालयातील स्टेनो श्री.प्रमोद गणवीर यांनी यशस्वीरित्या पार पाडले.