सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
भंडारा दि.12 : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समितीच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, कर्मचारी व सर्व नागरीकांकरीता रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणूनडॉ.मंगेश वानखेडे, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, प्रशांत सुर्यवंशी, अध्यक्ष व मंजूषाताई चव्हाण कोषाध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती, किशोर पाथोडे लेखाधिकारी, हिरामणजी लांजेवार, सदस्य जेष्ठ नागरिक समन्वय समिती तसेच शहरातील इतर गणमान्य नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. रक्तदानामध्ये जयंती समारोह समितीच्या सदस्यांनी, सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी, अभ्यासिकेतील विद्यार्थी व नागरीकांनी मोठया संख्येने सहभाग घेवून रक्तदान केला, तसेच आरोग्य तपासणी शिबीरात भंडारा शहरातील ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी व समितीच्या सदस्यांनी आरोग्य तपासणी केली. जिल्हा रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षीत चमुव्दारे बीपी, शुगर, थायरॉईड रक्ताची चाचणी, डोळे तपासणी, दंतवैद्यकांव्दारे दंत तपासणी, इत्यादी तपासण्या करुन सहकार्य केले. तसेच शासकीय ब्लड बँकव्दारे रक्तदानाकरीता सहकार्य करण्यात आले.