10 जूनपर्यंत रेतीघाटधारकांना रेती / वाळूच्या उत्खननास परवानगी

10 जूनपर्यंत रेतीघाटधारकांना रेती / वाळूच्या उत्खननास परवानगी

Ø 30 सप्टेंबर 2023 पर्यंत रेतीसाठ्यावरून वाहतूक व विक्रीस मुभा

 

चंद्रपूर, दि. 12 : सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 40 रेतीघाटास पर्यावरण अनुमती प्राप्त झाली असून त्याची मुदत दि. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत देण्यात आली होती. त्यामुळे या कार्यालयाच्या दि. 27 फेब्रुवारी 2023 च्या पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व रेतीघाटधारकांना दि. 1 मार्च 2023 पासून पुढील आदेशापर्यंत रेतीघाटामधुन रेतीचे उत्खनन बंद करण्याबाबत कळविण्यात आले होते.

 

राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरण समितीने संदर्भीय बैठकीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 40 रेतीघाटास पर्यावरण अनुमतीस दि. 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सर्व रेतीघाटधारकांना दि. 10 जून 2023 पर्यंत रेतीघाटामधून रेती / वाळुचे उत्खनन करता येईल. तसेच दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत रेतीसाठ्यावरून वाहतूक व विक्री करता येईल, असे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.