ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता
पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित
गडचिरोली, दि.10: उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये, दिनांक 06 एप्रिल 2020 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे
ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात पुढीलप्रमाणे राबविण्यात येत आहे.
तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18 एप्रिल 2023 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबंधित तहसिल कार्यालयाचे ठिकाण)-दिनांक 25 एप्रिल 2023 (मंगळवार) ते दिनांक 02 मे 2023 (मंगळवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 (दिनांक 29 एप्रिल 2023 शनिवार, दिनांक 30 एप्रिल 2023 रविवार व दिनांक 01 मे 2023 ची सार्वजनिक सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (संबंधित तहसिल कार्यालयाचे ठिकाण) दिनांक 03 मे 2023 (बुधवार) वेळ सकाळी 11.00 वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (संबंधित तहसिल कार्यालयाचे ठिकाण)- दिनांक 08 मे 2023 (सोमवार) वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ दि. 08 मे 2023 (सोमवार )व वेळ दुपारी 3.00 वाजेनंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 18 मे 2023 (गुरुवार) (गडचिरोली जिल्ह्यासाठी सकाळी 7.30 वा.पासून ते दुपारी 3.00 वा.पर्यंत.), मतमोजणीचा दिनांक दि.19 मे 2023 (शुक्रवार).
वरीलप्रमाणे निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचेकडून याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. सोबत तालुकानिहाय तपशिल जोडण्यात येत आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.