धर्मादाय रुग्णालय योजनेकरीता निर्धन व दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित

धर्मादाय रुग्णालय योजनेकरीता निर्धन व दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित

 

चंद्रपूर, दि. 23 : विधी व न्याय विभाग यांच्या 2 मार्च 2023 रोजीच्या अधिसुचनेद्वारे , महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम 1950 चे कलम 41 अअ च्या प्रयोजनअन्वये धर्मादाय रुग्णालय योजनेकरीता निर्धन व्यक्ती यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष 80 हजार रुपये तर दुर्बल घटकातील व्यक्ती यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लक्ष 60 हजार अशी विनिर्दिष्ट करण्यात आली आहे. शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाले असून निर्धन व दुर्बल घटकांना या योजनेचा लाभ घेणे सोयीचे होईल, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त पी.के. करवंदे यांनी कळविले आहे.