सखी वन स्टॉप सेंटरचे जनजागृती कार्यक्रम
गडचिरोली, दि.18: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे ‘सर्वांना समान न्याय’ अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 17/03/2023 रोजी आयोजीत या कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात अंतर्गत जनहीत बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, येणापूर यांच्या पथनाट्यातून गावकऱ्यांना कौंटूबिक हिंसाचार कायदा, बालविवाह, स्त्रीभृणहत्या व हुंडाबळी या विषयावार पथनाट्य सादर करीत सखी वन स्टॉप सेंटर ची माहिती देवून माहितीपर पत्रकांचे वितरण करण्यात आले.
केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ही कोणत्याही हिंसाचारातील पीडीत महिला व मुलींना वैद्यकीय मदत, समुपदेशन, कायदेविषयक मदत, पोलीस मदत आपतकालीन सेवा तथा तात्पुरता निवास सेवा व पुनर्वसन अशा अनेक सेवा एका छताखाली उपलब्ध करुन देणारी एक विशेष योजना आहे अशी माहिती या कार्यक्रमा अतंर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर व बाल कल्याण समिती अध्यक्षा मा. श्रीमती वर्षा मनवर यांच्या मार्गदर्शनात केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार यांनी उपस्थितांना दिली. तसेच अशी पीडीत महिला व मुली आढळल्यास तात्काळ 181 महिला हेल्पलाईन, 07132-295675 व 9637976915 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली चे सचिव राजेंद्र पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीच्या मा. अध्यक्षा श्रीमती. वर्षा मनवर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन महिलांविषयक कायदे व योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मार्कंडादेव चे सरपंच, मार्कंडादेवस्थान समितीचे सचिव यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले तथा मोनिका वासनिक, वन स्टॉप सेंटर गडचिरोली व रवींद्र बंडावार, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी मेहनत घेतली.