स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क कार्यशाळा संपन्न

स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क कार्यशाळा संपन्न

 

भंडारा दि 16: महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने आज माविम प्रांगण, मोहाडी येथे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत ‘स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क’ कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी अॅड. प्रशांत मेहता यांनी स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले. यावेळी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे उपस्थित होते. या कार्यशाळेत लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक, सहयोगीनी, सीआरपी उपस्थित होत्या.