रावणवाडी येथे युवा नेतृत्वाचे शिबिर उत्साहात संपन्न

रावणवाडी येथे युवा नेतृत्वाचे शिबिर उत्साहात संपन्न

भंडारा दि. 15: नेहरू युवा केंद्र तर्फे नुकतेच रावणवाडी येथे युवा नेतृत्वाचे शिबिर संपन्न झाले.

 

युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र तर्फे नुकताच ग्रामवन समिती रावणवाडी येथे 3 दिवसीय युवा नेतृत्व और सामुदायिक विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातील युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.सुमंगल वातावरणात व्यासपीठावरील सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी नेहरू युवा केंद्र भंडाराचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 

शिबिराचे उद्घाटक नितिन पाटील व्यवस्थापक इंडियन पोस्ट पेमेंट बँक भंडारा यांनी बँकेच्या स्पर्धा परीक्षेच्या बाबत सविस्तर माहिती दिली व त्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्ष कार्तिकस्वामी मेश्राम शासनाचे अधिकृत प्रचार प्रसारक यांनी पर्यावरण म्हणजे काय आपण कश्याप्रकरे पर्यावरणाचा समतोल ठेवू शकतो यावर मार्गदर्शन केले.

 

राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त यांनी ऋषिकुमार सुपारे यांनी योगा व प्राणायम यांचे महत्व सांगितले. जोसेफ वाढई माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक यांनी योगा प्रत्यक्षात करवून आपल्या जिवनात योगाचे काय महत्व पटवून दिले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख व्याख्याते नरेश बाबू दिपटे विकास अधिकारी एल.आय.सी ऑफिस, तुमसर यांनी विविध रोजगाराच्या संधी व एल.आय.सी बद्दल व व्यक्तिमत्व विकास यावर माहिती दिली.

 

प्रमुख व्याख्याते भीमराव रंगारी नॅशनल ट्रेनर यांनी व्यक्तिमत्व विकासामध्ये बाह्य व आंतरिक विकास यांची सांगड करून आंतरिक विकासाचे प्रकार यावर मार्गदर्शन केले. जितेंद्र मेश्राम नॅशनल ट्रेनर यांनी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले.

 

शिबिराच्या तिसऱ्या दिवशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांनी करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकासात अत्यंत महत्त्वाच्या पैलू वर युवकांसोबत चर्चा केली. प्रमुख अतिथी वसंत केवट यांनी वन्यजीव व पर्यावरण महाराष्ट्रात व विदर्भातील ग्रामीण भागातील सापांचे प्रकार व सापाने दंश केल्यावर प्राथमिक उपचार व उपचार यावर मार्गदर्शन केले. तीन दिवसीय युवा नेतृत्व आणि सामुदायिक विकास प्रशिक्षण शिबिरा मध्ये 43 प्रशिक्षणार्थी नी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व प्रशिक्षणार्थीनी गीत गायन, पथनाट्य,लोकनृत्य स्पर्धेत सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. या शिबिरात या शिबिराच्या यशस्वी करीता कार्यक्रम सहाय्यक रमेश अहिरकर, सूत्र संचालन नेहरू युवा केंद्र भंडारा ची राष्ट्रीय युवा स्वयंसेवक कोयल मेश्राम यांनी केले तसेच सर्व तालुक्यातील रा.यु. स्वयंसेवक छाया रासेकर, सौरभ बोरकर, अतुल गेडाम, समीर नागपुरे, आदर्श रामटेके, अनिल मुंडले,ज्योती चौधरी,जयश्री बिसने, नरेश सावरबांधे, सुर्यकांत मरघडे, प्रशांत घरडे अथक प्रयत्न केले.