शिर्डी येथील राज्यस्तरीय महा-पशुधन एक्स्पोमध्ये पशुपालक/शेतकरी यांनी सहभागी होण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
भंडारा दि. 15: पशुसंवर्धन विभागातर्फे शिर्डी येथे राज्यस्तरीय महापशुधन एक्सपो दि. २४ मार्च ते २६ मार्च तीन दिवस आयोजित करण्यात आलेलाआहे. महाराष्ट्र राज्यातील ह्या भव्य पशुप्रदर्शनात भंडारा जिल्ह्यातील पशुपालक व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पशुसंवर्धन विभाग,भंडारा यांनी केले आहे.
जिल्ह्याची ओळख असलेल्या जातिवंत पशुधनासह प्रदर्शनात सहभाग घेता येईल. प्रथम, द्वितीय, तृतीय अशी लाखो रुपयांची बक्षीसे वितरीत करण्यात येणार आहेत. पशूनां ने-आण करावयाची राशी तसेच पशुधन सोबत असलेल्या व्यक्तीस मोफत राहणे व जेवणांची सोय केलेली आहे.
पशुपालक/ शेतकरी यांनी प्रत्यक्ष प्रदर्शनीला भेट देऊन विविध स्टाल वरील माहिती, सहभागी पशुधन, देशातील इतर राज्यामधून आलेल्या पशुपालकांशी चर्चा करावी, विचारांची आदान प्रदान करावी, चर्चा सत्रामध्ये सहभागी होऊन नवीन संशोधन, पशुविज्ञान विद्यापीठ, कृषी विद्यापीठ यांच्याद्वारे दिलेली माहिती नवनवीन तंत्रज्ञान माहिती घेऊन स्वत: आपल्या विकासात्मक कार्यात उपयोग करावा. पशुपालकांच्या सहली, बचत गट सहल, माविम सहल शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी सुद्धा यात सहभागी व्हावे.
पशुप्रदर्शन स्थळ हे धार्मिक स्थळापासून अगदी जवळ आहे. ह्या महापशुप्रदर्शनात, MAFSU, कृषी विद्यापीठ, मत्स्य विभाग कृषी विभाग, दुग्ध व्यवसाय विभाग यांचा सहभाग असून जीवन्नोतीच्या पासून ते विकासात्मक तथा रोजगार उपलब्धीच्या संधी वेधून घेणाऱ्या असतील .करीता सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ज्या पशुपालकांना प्रदर्शनात आपले पशुधन सहभागी करावयाचे आहे, त्यांनी तत्काळ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद भंडारा येथे अथवा पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग येथे संपर्क साधावा.