रोजगार, स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण

रोजगार, स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण

 

भंडारा, दि. 10 : पारंपरिक शिक्षणाशिवाय प्रशिक्षण घेऊन रोजगार, स्वयंरोजगार मिळविणे ही काळाजी गरज झाली आहे. याच आधारे केंद्र तसेच राज्यशासन कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहेत.

 

याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातही सन २०२२-२३ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या माध्यमातून किमान कौशल्य विकास कार्यक्रम तसेच प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील रोजगार, स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.

 

जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय नैसर्गिक संसाधने तथा साधन सामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील स्वयंरोजगारासाठी अधिक प्रशिक्षणाचे विशिष्ट कोर्सेस राबविणे तसेच मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन या क्षेत्रांच्या कौशल्याच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे या उद्दिष्टांकरिता किमान कौशल्य उपलब्ध आहेत. विकास कार्यक्रम आणि प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु होणार आहे.

 

निःशुल्क प्रशिक्षण घेण्याकरिता उपलब्ध कोर्सेस पुढीलप्रमाणे, जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी बीकीपर, व्हेजीटेबल ग्रोवर, ऑरगॅनीक ग्रोवर, फे्रशवॉटर ॲक्वाकल्चर फॉर्मर, शिलाई मशीन ऑपरेटर, फ्लेबोटोमिस्ट, प्लंबर – जनरल, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन, फील्ड टेक्निशियन ॲन्ड अदर होम अप्लायन्सेस, फिटनेस ट्रेनर, फोर व्हीलर सर्व्हिस असिस्टंट, सीएनसी ऑपरेटर टर्निंग, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, फॅब्रिकेटर, हेअर स्टायलिस्ट, आदी कोर्सेस उपलब्ध आहेत.

 

इच्छुक युवक युवतींना खालील लिंकद्वारे गुगल फॉर्ममध्ये पूर्वनोंदणी करता येईल. जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील रोजगार, स्वयंरोजगार इच्छुक युवक-युवतींनी निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी https://forms.gle/Eioakow5aH3JahD66 या गुगल फॉर्ममधील उपलब्ध कोर्सेमध्ये नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल भंडारा 07184-252250 येथे किंवा प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्रांचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.