क्रीडा गुण सवलतीसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे -जिल्हा क्रीडा अधिकारी

क्रीडा गुण सवलतीसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे -जिल्हा क्रीडा अधिकारी

 

भंडारा, दि. 10 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयता 10) साठी प्रविष्ट विद्यार्थ्याच्या बाबतीत विद्यार्थ्याचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग असावा. तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयता 12) साठी प्रविष्ट् विद्यार्थ्यांचा स्पर्धेतील सहभाग विचारात घेवून सन 2022-23 मध्ये क्रीडा गुणाची सवलत देण्यात येणार आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या व शासनामार्फत आयोजित होणाऱ्या व शासन निर्णयातील परिशिष्ट 12 मधील नमुद शालेय क्रीडा सातील मान्यताप्राप्त खेळामध्ये तसेच खेळाच्या अधिकृत संघटनामार्फत आयोजित जिल्हा/विभाग/ राज्य व राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत | झालेल्या किंवा प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंचे प्रस्ताव शासनाच्या आपले सरकार या वेब पोर्टलवर उपलब्ध Submit Right to Services (RTS) प्रणालीवर भरणा करुन विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह (अर्ज,खेळाचे प्रमाणपत्र,हॉल टिकट, हजेरी पत्रकाची सत्यप्रत) या कार्यालयास दि. 31 मार्च 2023 पर्यंत सादर करण्यात यावे, त्यानंतर प्रस्तावांचा स्विकार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी कळवले आहे.