कृषि केंद्र धारकांनी अनुदानित खताची विक्री पॉस मशिन व्दारेच करावी- डॉ. अर्चना कडू
· भंडारा जिल्हयातील 12 खत परवाने निलंबीत
· जिल्हा अधिक्षक यांची कारवाई
भंडारा, दि. 10 : जिल्हयात रब्बी उन्हाळी धान पिकाची रोवणी झालेली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. यावेळी शेतक-यांची मोठया प्रमाणात रासायनिक खताची मागणी असते. केंद्र शासनाने रासायनिक खताची विक्री पॉस मशिन व्दारे करणे कृषि केंद्र धारकांना बंधनकारक केले आहे. पण यानंतरही जिल्हयातील काही कृषि केंद्र धारकांनी ऑफलाईन पध्दतीने अनुदानित रासा. खताची विक्री करून खत ( नियंत्रण ) आदेश 1985 व खत (हलचल) आदेश 1973 चे उल्लंघन केले आहे, अश्या कृषि केंद्र धारकांची सुनावणी घेवून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी 12 कृषि केंद्रांचे खत परवाने निलंबीत केले आहे.
कृषि केंद्रधारक नियमांचे कटाक्षाने पालन करीत आहेत किंवा नाही याची धडक मोहीम जिल्हा व तालुका भरारी पथकाव्दारे राबविण्यात आली होती. या तपासणी मोहीमेत परवाना दर्शनी भागात न लावणे साठा व दर फलक ग्राहकास सहज दिसेल अश्या ठिकाणी न लावणे, पॉस मशिनप्रमाणे प्रत्यक्ष साठा जुळत नसणे, साठा पुस्तक C अदयावत नसणे, शेतकऱ्यांना एम फॉर्म ची व पॉस मशिनची पावती न देणे, खत कंपन्यांचा परवान्यात समावेश असणे, खरेदी केलेल्या खताची साठा पुस्तकात नोंद नसणे शेतकऱ्यांची सही नसणे, पॉस मशिन बंद असणे, अनुदानित खताची ऑफलाईन पध्दतीने विक्री करणे या बाबी आढळून आल्याने जिल्हयातील 12 खत परवाने निलंबीत केले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा डॉ. अर्चना कडू यांनी कळविले आहे.
या कृषि केंद्रांचे परवाने 45 दिवसांसाठी निलंबीत
परमात्मा कृषि केंद्र, मोहदुरा ता. भंडारा, चेतन कृषि केंद्र, हत्तीडोई ता. भंडारा, परमपूज्य श्री. माताजी निर्मलादेवी कृषि केंद्र, साखळी ता.तुमसर, हरीओम कृषि केंद्र, पवनारा ता..तुमसर, प्रियंका कृषि केंद्र, येरली ता.तुमसर या पाच कृषि केंद्रांचे परवाने 45 दिवसांसाठी निलंबीत केले आहे.या कृषि केंद्रांचे परवाने 30 दिवसांसाठी निलंबीत गिता अॅग्रो एजन्सी, ठाणा ता. भंडारा, अमन कृषि केंद्र, चिखली, ता. भंडारा, राधे कृषि केंद्र, डोंगरी बु ता.तुमसर साहील कृषि केंद्र, गोबरवाही ता.तुमसर, रेणुका कृषि केंद्र . माडगी ता.तुमसर, श्रीधर कृषि केंद्र, चिचोली ता.तुमसर,आकांशा कृषि केंद्र, पवनारा ता.तुमसर या सात कृषि केंद्रांचे परवाने 30 दिवसांसाठी निलंबित केले आहे.
रासायनिक खत विक्री करणाऱ्या कृषि केंद्र धारकांनी खते विक्री करतांना नियंत्रण आदेश 1985, खत (हलचल) आदेश 1973 व परवाना अटी व शर्थी नियमांचे पालन करावे, दररोज साठा व दर फलक अदयावत करावा, पॉस मशिनवरूनच खत विक्री करावे, त्याची पावती व एम. फॉर्म मधील बिल शेतकऱ्यांना दयावे, त्यावर शेतकऱ्यांची सही घ्यावी, पी.डी.एम. विक्री करतांना बिलात पोटॅश न लिहिता पी.डी.एम. असे लिहावे, खत विक्रीत कोणतीही अनियमीमता करू नये, जादा दराने विक्री करू नये, असा प्रकार आढळल्यास खत परवाने रद्द करण्यात येईल. जिल्हयात पुरेशा प्रमाणात खत पुरवठा झालेला असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय पीडीएम
Potash Derived From Mollases ) खरेदी करतांना काळजी घ्यावी एमओपी (Muriate Of Potash ) मध्ये 60 टक्के पोटॅश असून पी.डी एमध्ये केवळ 14.5 टक्के पोटॅश आहे, त्यामुळे पोटॅशचा डोज धान पिकाना चार ते पाच पट पी.डी.एम. बॅग खरेदी कराव्या तरच पिकाला फायदा होईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा डॉ. अर्चना कडू यांनी केले आहे.