62 रुग्णांनी घेतला कर्णबधिर तपासणी शिबिराचा लाभ
16 रूग्णांना श्रवण यंत्र वाटप
भंडारा, दि. 9 : जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह निमित्त कर्णबधिर तपासणी शिबिर व श्रवण यंत्र वितरण शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी सदर शिबिराचा लाभ घेतला. यापैकी 42 लोकांची ऑडिओमॅट्री तपासणी करण्यात आली त्यापैकी 39 व्यक्तींना बहिरेपणा आढळला, 3 व्यक्ती नॉर्मल आढळले, एकूण 6 व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले. 16 व्यक्तींना राष्ट्रीय कर्णबधिर नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले व 18 रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्या कार्यक्रम अंतर्गत श्रवण यंत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या शिबिरास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम सर, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. प्रदीप आनंद सर, डॉ. अमोल मानकर, डॉ. शैलेश कुकडे सर्व NCD व DEIC अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.