सरकारी जॉबसाठी एम्प्लॉयमेंट कार्ड काढावे- सहाय्यक आयुक्त
भंडारा दि. 27 : शासकीय योजनांच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार मिळविण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या महास्वयंम संकेतस्थळावरून ऑनलाइन एम्प्लॉयमेंट कार्ड काढणे आवश्यक झाले आहे. तरी लाभार्थ्यांनी एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना, जिल्हास्तरीय योजनेंतर्गत विविध विषयांचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यासाठी या यंत्रणांकडून नोंदणीकृत उमेदवारांच्या याद्या या कार्यालयाकडून मागविल्या जातात.
एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा. लाभार्थीकडे आधीच रोजगार असेल तर इत्यादी माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षे किवा त्यापेक्षा जास्त असावे, लाभार्थीकडे आधीच रोजगार असेल तर तो या पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही. नोंदणी करिता आधार कार्ड, मोबाइल नंबर. फोटो / वय प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, सरपंच किंवा नगर परिषदेने दिलेले प्रमाणपत्र, पालकाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.