प्रशासकीय भवन परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रमदान
Ø सहाय्यक जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम
चंद्रपूर, दि. 26: आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तसेच आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविन्यात आली. तर आता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर प्रशासकीय भवन परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
प्रशासकीय भवन येथे विविध कार्यालय आहेत. या कार्यालयात दैनंदिन शासकीय कामकाजाच्या निमित्ताने नागरिकांची व अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. तसेच इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. या श्रमदानात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक प्रमोद घाडगे यांच्यासह प्रशासकीय भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.