काजी व्यापार संकुल येथील ७ गाळ्यांना ठोकले टाळे मनपा कर वसुली पथकाची मोठी कारवाई

काजी व्यापार संकुल येथील ७ गाळ्यांना ठोकले टाळे

मनपा कर वसुली पथकाची मोठी कारवाई

 

चंद्रपूर २५ फेब्रुवारी : एकुण २१,३२,७०१/- रुपयांची थकबाकी असणाऱ्या काजी व्यापार संकुल येथील ७ गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. या ७ गाळ्यांवर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.कर विभागातर्फे एकुण १० गाळ्यांवर कारवाई प्रस्तावीत होती. यापैकी ३ गाळेधारकांनी आदल्या दिवशी कराचा पुर्ण भरणा केला मात्र इतर ७ गाळेधारकांनी कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने सदर कारवाई केली आहे.

यात काजी व्यापार संकुल मार्केट येथील गाळा नंबर ४ ए-१०४३ – निळकठ शामराव रघाताटे, ४ ए-१०३६-लखन.बा.साखान,४ ए-१०३५- दत्ता नामदेव ढवळे, ४ ए-१०३१- सतोष लखन सारवान,४ ए -१०३०- डि. एम. बेले, ४ ए-१०२८- रय्यत नागरी.स.प.सस्था.मर्या, ४ ए-१०२६- शकील शेख पापा शेख असे एकुण ७ गाळे सील करण्यात आले. या सर्व गाळ्यांवर एकुण २१,३२,७०१/- रुपयांची थकबाकी आहे.

सदर कारवाई २४ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे व कर विभाग प्रमुख अनिल घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,मार्केट लिपिक प्रविण हजारे ,मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अतिक्रमण विभाग कर्मचारी पथकाने केली.