ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 

भंडारा, दि. 23 : निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट संरपचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात एकूण 23 ग्रामपंचायतमधील 32 सदस्याची पदे रिक्त झाली आहेत. यात थेट सरपंच पद रिक्त नाही. तर सहा महिन्याच्या आत तुमसर तालुकयातील एका ग्रामंपचायतीची मुदत संपणार आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादी कार्यक्रमानुसार 31 डिसेंबर 2022 पर्यत उपरोक्त उल्लेखीत कारणांमुळे रिक्त झालेल्या तसेच थेट संरपाच्या रिक्त जागांचा ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार दि.24 फेब्रुवारी 2023, हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी 24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 तर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द 9 मार्च 2023 पर्यत करण्यात येईल. तरी सर्व तहसीलदारांनी वरीलप्रमाणे ग्रामपंचायतयीचे रिक्त पदाची पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबवून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याचे लेखी आदेश उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी निर्गमीत केले आहे.