छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवाजी चौक येथील स्मारकाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
चंद्रपूर, दि. 18 : सामान्य प्रशासन विभागाच्या 18 जानेवारी 2023 च्या शासन परिपत्रकान्वये, राज्यातील राष्ट्रपुरुष/ थोरव्यक्तींची जयंती साजरी करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. शासनामार्फत दरवर्षी दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. त्या पार्श्वभूमिवर आज दि.18 फेब्रवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्व अधिकारी व संबधित विभाग प्रमुखांनी स्वत: पुतळा परीसराची पाहणी करुन संबधित यंत्रणाकडून रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करुन घेतले. या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी शहरातील शिवाजी चौक येथे भेट देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांची पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाच्या 1 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून सदर गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने योग्य व काळजीपूर्वक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले आहे.