दोनशेहून अधिक शेतकरी तुती रेशीम
उद्योग कार्यशाळेत सहभागी होणार
· आज एक दिवसीय कार्यशाळेचे नियोजन भवन येथे आयोजन
भंडारा, दि. 16 : जिल्हयात तुती रेशीम उदयोगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी उद्या शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत नियोजन भवन, भंडारा येथे तुती रेशीम उद्योग विकासाबाबत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील दोनशेहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहे.
या कार्यशाळेला माजी संचालक, रेशीम संचालनालय, तथा माजी विभाग प्रमुख कृषी विस्तार विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कॅप्टन डॉ. एल.बी. कलंत्री यांचे प्रमुख मार्गदर्शन हे या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण राहणार आहे. तसेच उपसंचालक रेशीम सचांलनालय, नागपूर महेंद्र ढवळे, (वैज्ञानीक-सी) बी.एस.एम.टी.सी. केंद्रिय रेशीम मंडळ, भंडारा डॉ.प्रविण गेडाम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, गोंदिया डॉ. सय्यद शाकीर अली, हे उपस्थित राहणार आहे.
तसेच सहभागी शेतकऱ्यांच्या या उद्योगा विषयी असणाऱ्या प्रश्नांचे समाधानही या वेळी तज्ञ मंडळी करणार आहे. शेतकरी बांधवांनी कार्यक्रमात सहकुटुंब व तूती रेशीम करू इच्छिणाऱ्या आपल्या अन्य मित्रमंडळी यांचेसमवेत हजर राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. मनरेगा व इतर योजनांचा लाभ कसा घेता येईल, व तुती रेशीम शेती यशस्वी कशी करता येईल याबाबत संपूर्ण माहिती या कार्यशाळेत मिळणार असून शेतकऱ्यांनी आपले नाव रेशीम विभागाच्या किंवा कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्याकडे नोंदवून घ्यावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी श्री. ढोले यांनी केले आहे.