जिल्हाधिकारी यांच्याहस्ते अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरीत
भंडारा, दि. 15 : महसूल विभाग प्रतिक्षासुची सन 2020 मधील सहा व सामायिक प्रतिक्षासुची सन 2012 मधील एक अशा एकूण सात उमेदवारांना अनुकंपा तत्वावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देवून उपविभागीय कार्यालय भंडारा, तुमसर, तहसिल कार्यालय पवनी व जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे नियुक्ती देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे, अर्चना यादव उपस्थित होत्या.
नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी म्हणाले की, तुम्हाला शासनात येण्याची संधी मिळाली असून तुमचा नागरिकांशी थेट संबंध येणार आहे. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे व वेळेत काम करावे असे त्यांनी सांगितले तसेच सात उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्यांमध्ये अंकुश विठ्ठल पाटील तहसिल कार्यालय पवनी, मयुर भास्कर कठाणे जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, मिलींदकुमार निलकंठ गोटेफोडे उपविभागीय कार्यालय भंडारा, निखील अरूण येरणे उपविभागीय कार्यालय तुमसर, प्रिया राजकुमार ठवकर उपविभागीय कार्यालय तुमसर, हिमांशु सुनिल साखरे उपविभागीय कार्यालय तुमसर व तुषार सुरेश कावळे उपविभागीय कार्यालय तुमसर येथे नियुक्ती देण्यात आली आहे.