महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर
१६९ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
चंद्रपूर १ फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिका, श्रीमती विमलादेवी मेडीकल कॉलेज द्वारा संचालित आयुर्वेदिक व ॲलोपेथिक हॉस्पीटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आले होते.
आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरवात करण्यात आली.धकाधकीच्या जीवनामुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव वाढला आहे. ही स्थिती आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. यापासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम करा. तणावमुक्त जीवन जगण्याचा सल्ला आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिला.
सकाळी १० ते ६ या वेळेत आयोजीत करण्यात आलेल्या या शिबिरात १६९ अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ.विजया खेरा,डॉ.नरेंद्र जनबंधु, डॉ. अतुल चटकी यांनी प्रयत्न केले.
या केल्या तपासण्या – आयुर्वेदिक व ॲलोपेथिक हॉस्पीटल येथील डॉ.तुषार जोगे, डॉ.विनोद गणोर,डॉ.मुरके, डॉ.प्रदीप पाटील या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली. यात संपूर्ण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, ECG, रक्तदाब, मधुमेह तपासणी यांचा समावेश होता.