आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हा स्तरीय कार्यशाळा

आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हा स्तरीय कार्यशाळा

 

गडचिरोली, दि.31: 27 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समिती भवन गडचिरोली येथे आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 व PMFME योजने अंतर्गत जिल्हा स्तरीय कार्यशाळाचे आयोजन जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते तरी,सदर कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी,धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि प, राजेंद्र भुय्यार, जिल्हा प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक,युवराज टेम्भुणे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बसवराज मास्तोळी,उपविभागीय कृषी अधिकारी अहेरी, आनंद गंजेवार हे उपस्थित होते.धनाजी पाटील यांनी जिल्ह्यात पीक क्षेत्र वाढविण्याबरोबर त्याची विक्री व पौष्टिक तृणधान्य ची भाकर व इतर पदार्थ खाणारा वर्ग तयार करावा व विशेषतहा ज्या भागात भाकरी खाण्याचा प्रमाण जास्त आहे त्या भागात प्रशिक्षण सहल आयोजित करावे असे सांगितले. राजेंद्र भुय्यार यांनी जिल्हा परिषद विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजना अंतर्गत पोषणमुल्य वाढविण्यावर भर देऊन मुलांच्या आहारात पोषक असे पौष्टिक तृणधान्य चे समावेश करण्याचे नियोजन करू असे आश्वासन देण्यात आले.बसवराज मास्तोळी यांनी पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व सांगितले व स्थानिक पीक कोदो क्षेत्र वाढ करण्याचे आव्हान केले. पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढीबरोबर विक्री व्यवस्था चे नियोजन करणार असल्याचे सांगितले. PMFME योजने अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी आर्थिक सहायता चा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच जिल्ह्यात नावीन्य पूर्ण बाब स्ट्रबेरी उत्पादित झालेली स्ट्रबेरी मान्यवरांना खाण्याचा योग बसवराज मास्तोळी यांनी जुळवून आणला.

 

कार्यशाळेत पौष्टीक तृणधान्य वर आधारित भोजनाचे नियोजन करण्यात आलेले होते त्यात बाजरी ची भाकर,नाचणीची आंबील,भगर,भात,इत्यादी पदार्थ होते.सदर कार्यशाळेस उपस्थित उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद गंजेवार यांनी केली व पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 याचे संपूर्ण वर्षाचे नियोजन त्यांनी सांगितले व तृणधण्याचे अनन्य साधारण महत्व उत्तमरित्या पटवून दिले तसेच पौष्टिक तृणधान्य मध्ये असलेले प्रथिने व त्यापासून आपण कुठल्या रोगांपासून बचाव करू शकतो याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचा समारोप करतेवेळी बसवराज मास्तोळी यांनी जिल्हा स्तरीय समिती सदस्यांना “आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” साजरा करण्याकरिता विनंती व सभेस हजर राहिल्या बद्दल आभार व्यक्त केले.