जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रावर 89.15 टक्के मतदान
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ
भंडारा दि. 30: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2023 मध्ये जिल्ह्यात एकूण 12 मतदान केंद्रावर 89.15 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंत पार पडली. एकूण 12 मतदान केंद्रावर 3797 मतदार मतदान करणार होते. मतदान झालेल्या मतदारांची संख्या 3385 असून याची एकूण टक्केवारी 89.15 टक्के आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांनी कळविले आहे.