निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सुचना
भंडारा दि. 30: निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना सुचित करण्यात येते की, जानेवारी 2023 च्या निवृत्तीवेतनासोबत महागाई भत्ता थकबाकी देण्यात येणार आहे. तरी सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांचे महागाई भत्ता थकबाकी तपासण्याची तसेच आयकर कपातीबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जानेवारी चे निवृत्तीवेतन एक आठवडा विलंबाने होणार आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी अभय एस. निनावे यांनी कळविले आहे.