भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या
पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी
भंडारा, दि. 24 : संघ लोक सेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्या मार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेद्वारासाठी दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरिता दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती. संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 10 जानेवारी 2023 अशी होती. ऑन लाईन फॉर्म भरणेसाठी www.upsconline.nic.in या वेबसाईटचा वापर करावा. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परिक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशन साठी निवड करण्यात येते.
कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी नाशिक येथे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत CDS कोर्स 60 चे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आलेली आहे.
भंडारा जिल्हयातील इच्छुक उमेद्वारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Facebook / वेब पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करुन त्यामधील CDS-60 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दुरध्वनीवरून संपर्क करावा, असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.