भूजल आराखड्यात सूचविलेल्या बाबींवर अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी

भूजल आराखड्यात सूचविलेल्या बाबींवर अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी

 

भंडारा, दि. 24 : केंद्रीय भूमि जल बोर्डाच्या मध्यक्षेत्र, नागपूरच्या वतीने भंडारा जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना सादर केला. आराखड्याचे सादरीकरण देखील करण्यात आले. भूजल आराखड्यात सूचविलेल्या बाबींवर अंमलबजावणी करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जलजीवन मिशनशी संबंधित सर्व अधिकारी, बोर्डाचे वैज्ञानिक अभय निवसरकार, निलाफर, प्रकाश महाराणा, पाणी पुरवठा व जल संपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाच्या केंद्रीय भूमि जल बोर्ड, जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभागाने जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील पर्जन्यमान, मानसूनपूर्व व नंतरची पाणी पातळी, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ व घट, जिल्ह्यातील भूगर्भस्तिथी, माती व जमीनीचा वापर, कृषि उत्पादन क्षमता, वॉटर टेबल, भूगर्भीय खडक, भजूल स्त्रोत, संसाधनांची उपलब्धता व वापर, पाण्याची उपलब्धता मागणी व वापर आदींचा सखोल अभ्यास करून सदर आराखडा तयार करण्यात आला आहे.

 

वैज्ञानिक नीलोफर यांनी अहवालाचे सादरीकरण केले. भमिजल बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याच्या भूजल व्यवस्थापनाबाबत चर्चा केली. बोर्डाने आपल्या अहवालामध्ये सूचविलेल्या बाबींवर अंमलबजावणी करण्यात येईल, असे यावेळी सादरीकरणानंतर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.