दिशा योजने अंतर्गत कायदेविषय शिक्षण शिबीर संपन्न
गडचिरोली, दि.16: तालुका विधी सेवा समिती,धानोरा तर्फे मौजा,गिरोला,ता.धानोरा,येथे गिरोला ग्रामपंचायत सभागृहात 14 जानेवारी 2023 रोजी दिशा योजने अंतर्गत कायदेविषय शिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.आर.खामतकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती धानोरा,तथा दिवाणी न्यायाधिश,( कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी धानोरा हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री.कोमलवार साहेब अति.संवर्ग विकास अधिकारी,प.स. धानोरा. राहुल गावडे, पॅनल अधिवक्ता ता.वि.से.स.धानोरा, श्री. चौधरी,पोलीस उप निरिक्षक,पो.स्टे. चातगाव,श्री.करंगामी, महिला व बाल संरक्षण अधिकारी, धानोरा, यु.एम.मडावी,अधिवक्ता, सौ. जांभुळकर मॅडम, ग्रामसेविका, गिरोला, गावातील सरपंच, उपसरपंच हे उपस्थीत होते. गिरोला गावांची संख्या अंदाजे 700 आहे. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष प्रमुख पाहुणे मार्गदर्शकांनी दिशा योजनेला अनुसरुन आपआपल्या क्षेत्रातील कायदयांशी निगडीत कायदेविष्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थीत 95 लोकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला.