व्यावसायिक व उद्योजक यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी
उद्योग संचालनालय, मुंबई व मैत्री कक्ष मार्फत कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली, दि.12: व्यावसायिक व उद्योजक यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी उद्योग संचालनालय, मुंबई व मैत्री कक्ष मार्फत बुधवार, दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता R-SETI हॉल, बँक ऑफ इंडिया, प्रशिक्षण केंद्र, (कॉम्पलेक्स), गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले आहे. आय.टी. पातळीवर व नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या सुधारणा व शासनाने राबविलेल्या विविध सुधारणाविषयी वापरकर्त्याकडून अभिप्राय घेण्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस (EoDB) सुधारणा बद्दल सादरीकरण होणार आहे. यानंतर प्रश्नोतरांचा कार्यक्रम आयोजन करुन, उद्योजकांचे शंका समाधान करण्यात येईल. या कार्यशाळेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक संघटना प्रतिनिधी, नामंकित उद्योजक, भावी उद्योजक, सनदी लेखापाल, वास्तु रचनाकार, उद्योग व्यवसायाशी संबंधित असणारे शासकीय विभागाचे अधिकारी तथा सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या कार्यशाळेकरिता प्रतिनिधींनी आपल्या उद्योजक सहकारी सोबत सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी करावी, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.